वाघ मासा ( टेरापॉन जरबुआ )
टेरापॉन जरबुआ : वाघ मासा म्हणून ओळखली जाते. हे हिंदमहासागर मध्ये व जवळ जवळ हे मासे जगातील काही ठिकाणे वगळता कमी जास्त प्रमाणात आढळतात जसा लाल समुद्र आणि पूर्व आफ्रिकेच्या सीमेपासून दक्षिणेकडील दक्षिण आफ्रिका पर्यंत तसेच प्रशांत महासागरा पर्यंत पूर्वेकडे सामोआ पर्यंत व उत्तरेकडे जपान आणि दक्षिणेस भागात देखील हे आढळतात. ही मत्स्यालयाच्या व्यापारामध्ये एक महत्त्वाची व्यावसायिक प्रजाती आहे.
पीएच 7.8 - 8.2
तापमान 24 -28 सी (75.2-82.4 फॅ)
खाद्य : वाघ मासा ( टेरापॉन जरबुआ ) खूप आक्रमक असतो. व मासभक्षक आहे. लहान मासे, कीटक, कोळंबी शिंपल्या तील जीव व काडी काडी मेलेले मासे हि खातो. बंधिस्त अवस्तेत तो ब्लड वर्म , टूबीफेक्स ,आणि इतर फिश फूड खातो.
आकार व रंग : टेरापॉन जरबुआ एक मध्यम आकाराचा मासा आहे. या माश्याचा आकार लांबट गोल दानही बाजूस निमुळता व शेपटीचा आकार वर खाली मधून व्ही आकाराची असते. डोळे साधारण बाहेर आलेले असतात. व खालच्या बाजूस वलेले असतात. वरून थोडे तिरकस असतात. वरील पंखाला काटे बाहेर आल्यासारखे दिसतात. प्रत्येक काट्या मध्ये किंचित अंतर असते आपण बघितल्यावर असा लक्षात येत कि काट्याने माश्याची त्वचा जोडून एक पूर्ण पंख तयार झाला आहे. वरील पंखा माश्याच्या शरीरावर मध्य भागी असते व त्यामधील काटे अंदाजे 10 किंवा 11 असू शकतात. वरील पंखा च्या मागे अजून एक पंख असतो. शेपटीचा भाग असतो. वरील पंख उघडू व बंद करू शकतो. खालील भागास ऐकून तीन पंख असतात. दोन पोट खाली व एक माश्याच्या जानेंद्रिये खाली शेपटी पर्यंत असते. तोंड तिरकस असून दोन्ही बाजूस समान लांबीचा असतो. तोंडात बारीक टोकदार दात असतात.
पांढरे शरीर चांदीच्या रंग प्रमाणे चमकदार असते. आणि काळपट तपकिरी रंगाचे शरीरावर 3 ते 4 वक्र पट्टे ते चंद्रकोरी प्रमाणे असतात. जे वरच्या पंखा पर्यंत गेलेले असतात वरच्या पंखाला दोन डाग असतात. मागील पंखावर आडव्या 4 ते 5 पट्टे असतात ते काही जणांन मध्ये डागा प्रमाणेही असू शकतात.
कल्या च्या मागे पारदर्शी पोहण्यासाठी दोन्ही बाजूला पंख असतात. अंगावर बारीक खवले असतात निरखून पाहता आपल्याला ते चौकोनी नक्षी प्रमाणे दिसतात. डोळ्याच्या पुढच्या भागात तोंडाच्या वरती दोन बारीक छिद्र असतात.
लांबी : वाघ मासा ( टेरापॉन जरबुआ ) माश्याची लांबी साधारण 8 ते 9 इंच एवढी मी पहिले आहे. आणि माझ्या वाचनात ती १४ ते १५ इंच पर्यंत जाते पण मी अजून एवढा लांबीचा मासा या जातीचा पहिला नाही.
मच्छालयत : वाघ मासा ( टेरापॉन जरबुआ ) खाडीच्या पाण्यात राहू शकतात पण त्यांना पूर्णतः गोड्या पाण्यात ठेऊनये कारण ते वयस्कर झाल्यावर पूर्णतः समुद्राच्या पाण्यात जातात. व ते मांसभक्षक असल्या कारणाने व आक्रमक स्वभावामुळे इतर माश्यांसोबत ठेवताना त्यांच्या पेक्षा मोठे मासे निवडावे. जसे मोनो अँजेल सारखे खाडीत राहणारे मासे असले पाहिजेत ते स्केट माश्याबरोबर हि राहतात पण काही वेळा जर ते त्याची हि शिकार करतात.
प्रजनन : वाघ मासा ( टेरापॉन जरबुआ ) नैसर्गिक वातावरणात. मच्छालयत खूप मुश्किल आहे. कारण त्याच्ये जीवनातील प्रवास हा असु शकतो असे मला वाटते.
पुढे काही दिवसात वाच...... क्रमश..
0 Comments
Subscribe करा आणि Follow करा. Share, like करा खाली बटन आहे.